जाताना एका विकास कामाचे उद्घाटन करून जायचे आणि येताना एका विकास कामांचा लोकार्पण सोहळा करून येणारा हा शिरोळ तालुक्यातील पहिला आमदार आहे.शिरोळ शहराच्या विकासासाठी आमदार यड्रावकर यांनी मोठे प्रयत्न करून कोट्यवधीचा निधी शहरासाठी खर्च केला आहे.प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.रस्ते,गटारी,विविध सांस्कृतिक हॉल,भुयारी गटार योजना यासह सर्वच कामे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर्ण केल्याने शिरोळ तालुक्यातून त्यांना मोठे मताधिक्य मिळून त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास जेष्ठ संघटनेचे नेते बजरंग काळे गुरूजी यांनी व्यक्त केला.