“बातमी कौतुकाची” कर्तव्य बजावत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दीपावली 

Spread the love

कर्तव्य बजावून पालिका कर्मचाऱ्यांनी साजरी केली दीपावली

सणात प्रत्येक दिवशी प्रामाणिकपणे केली शहराची स्वच्छता
शिरोळ / प्रतिनिधी 
दीपावली सणानिमित्त शासकीय निमशासकीय सहकारी व खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे.या सुट्टीचा आनंद दिपवाली सण उत्साहात साजरा करून सर्वच कर्मचारी घेत आहेत.अपवाद ठरत आहे ते केवळ शिरोळ नगरपरिषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी दिवाळीच्या सणाचा आनंद लुटत असताना कर्तव्याची जबाबदारी ओळखून या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातील स्वच्छता राखण्यासाठी भल्या पहाटे उठून आपल्याला दिलेला परिसर नीटनेटका ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम हाती घेत शिरोळ शहर स्वच्छ ठेवून उत्साहाने त्या कर्मचाऱ्यांनी आपली दीपावली साजरी करून सर्वांचाच आनंद द्विगुणित केला.दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.सर्वत्र मंगलमय वातावरण असताना शिरोळ नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी शुक्रवारी लक्ष्मीपूजनाची एकच दिवसाची सुट्टी घेऊन आज शनिवार पहाटे पासून पुन्हा स्वच्छतेचे काम करत आपले कर्तव्य बजावत शहराची स्वच्छता हीच आपली खरी दिवाळी म्हणत कामास आनंदाने सुरुवात केली त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.शिरोळ शहरात दिवाळी सण शुक्रवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.दिवाळी सणानिमित्त शासकीय, खासगी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तीन ते चार दिवस सुटी असते.मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना केवळ एक दिवस सुट्टी मिळते.दिवाळीच्या मुख्य दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर हे शिरोळ नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आज पहाटे पासून शहरातील स्वच्छता करण्यात व्यस्त झाले. अनेक वर्षे शहरात स्वच्छतेचे काम करताना नागरिकांसोबत त्यांचे ऋणानुबंध तयार झालेले असतात. त्यामुळे अनेक कर्मचारी आपल्या कर्तव्यात कधीही कसर सोडत नाहीत.आपले काम पूर्ण केल्यानंतर ते दुपारनंतर कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. सणासुदीच्या दरम्यान त्यांच्याकडून केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.सणासुदीच्या दिवसात विशेषता सर्वच परिसर कचरा आणि घाणीच्या साम्राज्याने व्यापून गेलेला असतो.दिवाळीच्या सणात शोभेच्या दारूचे फटाके उडवून रस्त्यावर फटाकाचे कागदे अणि बाजारात विक्री केल्यानंतर उरलेले साहित्य त्या ठिकाणी टाकले जाते.यामुळे या परिसरातील कचरा उठाव करून तो परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दररोज नियमितपणे सुरू असते. दिवाळीच्या सणात तर प्रत्येक ठिकाणची स्वच्छता करत असताना त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतात.पण आपलेच जीवाभावाचे लोक वर्षातून येणारा हा दीपावलीचा उत्साहात व जल्लोषात साजरा करीत असतात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नगरपरिषद कर्मचारी समाधानाने आपले काम प्रामाणिकपती पूर्ण करीत असतात नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिकांतील ऋणानुबंध यामुळे कोणतेही काम करत असताना हे कर्मचारी स्वाभिमानाने आपले कर्तव्य जबाबदारी पूर्ण करीत असतात त्यांच्या कार्याची दखल सुद्धा समाज घेऊन त्यांना नेहमी मदतीचा हात पुढे करत असतो कर्मचारी करत असलेल्या कामामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो हे मात्र नक्की
error: Content is protected !!