उच्चांकी मतदान देऊन पुन्हा विधानसभेत पाठवणार – नगराध्यक्ष अमरसिंह पाटील

Spread the love
आमदार यड्रावकर यांना शिरोळ शहरातून उच्चांकी मतदान देणार : अमरसिंह पाटील
शिरोळ येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
शिरोळ / प्रतिनिधी
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहराचा कायापालट झालेला आहे.तालुक्यातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहराला मिळाली. १ कोटींच्या निधीतून शहरात भुयारी गटार योजनेचा कार्यान्वित होत आहे.शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर समाजातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे प्रामाणिक काम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून झाले आहे.त्यामुळे यांना पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी देण्यासाठी शिरोळ शहरातून उच्चांकी मतदान देऊन त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवणार असल्याची ग्वाही, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली.शिरोळ येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ फीत कापून करण्यात आला,यावेळी अमरसिंह पाटील बोलत होते.स्वागतपर भाषणात बोलताना बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह पाटील म्हणाले,शिरोळ तालुक्यात २ हजार कोटींची कामे आणणारे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या इतिहासात राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडेच पाहावे लागेल.सर्व जाती-धर्माच्या भिंती मोडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे.त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठीशी उभी असून येणाऱ्या २३ तारखेला आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय निश्चित आहे.असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बजरंग काळे गुरुजी म्हणाले,जाताना एका विकास कामाचे उद्घाटन करून जायचे आणि येताना एका विकास कामांचा लोकार्पण सोहळा करून येणारा हा शिरोळ तालुक्यातील पहिला आमदार आहे.शिरोळ शहराच्या विकासासाठी आमदार यड्रावकर यांनी मोठे प्रयत्न करून कोट्यवधीचा निधी शहरासाठी खर्च केला आहे. प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.रस्ते,गटारी,विविध सांस्कृतिक हॉल,भुयारी गटार योजना यासह सर्वच कामे आमदार यड्रावकर यांनी पूर्ण केल्याने शिरोळ तालुक्यातून त्यांना मोठे मताधिक्य मिळून त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी विजय खातेदार,रामदास गावडे, मौजे आगरचे सरपंच अमोल चव्हाण,भगवान कोळी, प्रदीप खाडे यांची मनोगते झाली.यावेळी पॅंथर आर्मीच्यावतीने संतोष आठवले व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केला.तसेच यावेळी पंचगंगेचे संचालक बाबा पाटील,माजी सरपंच अर्जुन काळे,विजय देशमुख,यड्राव चे सरपंच कुणालसिंह निंबाळकर,रामदास गावडे, प्रसन्न देसाई,विजय खातेदार,भगवान कोळी, राजेंद्र चुडमुंगे माने,प्रदीप खाडे,दिग्विजय माने यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुरज कांबळे यांनी मानले.
error: Content is protected !!