आमदार यड्रावकर यांना निवडून आणूया डांगे यांचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निर्धार
कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील २ हजार कोटी रुपयांची विकास कामे करून तालुक्याच्या कायापालट आमदार यांनी केला आहे. कुरुंदवाड शहरात सुद्धा रस्ते,गटारी,विविध समाजाचे सांस्कृतिक हॉल यासह विविध विकास कामांसाठी कुरुंदवाड शहराला ३१ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी देऊन शहराचा विकास साधला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ तालुक्यातील मोठ्या मताधिक्याने निवडून आणू यामध्ये कुरुंदवाड शहराचा मोठा पुढाकार असेल असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी व्यक्त केले.राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ पागे मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.यावेळी रामचंद्र डांगे बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत मोरे यांनी केले.यावेळी समस्त मुस्लिम समाज, कोळी समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नेते सिताराम भोसले,चंद्रकांत जोंग,रघु नाईक,श्रीकांत माळी,पटवेगार, भीमराव पाटील, जिनाप्पा पवार,राजेंद्र घारे,शकील गरगरे, अभय पाटुकले,रामभाऊ मोहिते,धनपाल आलासे तुकाराम माळी, सोमेश गवळी,बाबासो भबिरे, आप्पासो जोंग, रणजीत डांगे, किशोर भाट,हरिदास शेडबाळे यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कामांचा आढावा घेतला, व त्यांना कुरुंदवाड शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला.यावेळी रामचंद्र डांगे पुढे म्हणाले,आज भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला.या मेळाव्यात राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडून आणण्यासाठी सूचना दिल्या असून त्या सूचनांचे पालन सर्व कार्यकर्ते करतील व त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील असे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले,शहरातील विविध समाजाचे सांस्कृतिक हॉल,रस्ते,गटारी यासह विविध विकास कामांसाठी शहराला आज अखेर ३१ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी दिला आहे.शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना शहरातील प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि झोपडपट्टी धारकांच्या निर्मिती करण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही काळात हा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार असून यापुढेही आपली सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.
यावेळी फारुख जमादार,दादासो पाटील,आयुब बागवान, चांद कुरणे, शरद आलासे, किरण आलासे,शकील गरगरे, दिपक गायकवाड,भीमराव पाटील,रामचंद्र मोहिते, रमेशअण्णा भुजूगडे, जवाहर पाटील, महेंद्र पाटील, बापूसो आसंगे, रावसो उगारे, आनंदा कुंभार, तानाजी डेळेकर,शिवदास फल्ले’ टिकाखान पठाण,बाबासो भबिरे, दिपक पोमाजे,अर्षद बागवान,बापू आसंगे, लियाकत बागवान,चांद कुरणे,महावीर पोमाजे, जिनगोंडा पाटील, संजय डोंगरे, गोंधळी समाजाचे अध्यक्ष गणपती गोंधळी, महेश निकम,भिमराव यादव,अक्षय आलासे,अजित देसाई,जय कडाळे,दिपक कांबळे,पप्पू बागवान,सुरेश बिंदगे,अवि बिडकर,कृष्णा नरके,बाबासो पट्टेकरी,सुभाष शिंदे,आर.आर.पाटील,दिलीप बंडगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उदय डांगे यांनी मानले.