आमदार यड्रावकर यांना शिरोळ व आगर गावातून उच्चांकी मताधिक्य देणार : रणजीतसिंह पाटील

Spread the love

आमदार यड्रावकर यांना शिरोळ व आगर गावातून उच्चांकी मताधिक्य देणार : रणजीतसिंह पाटील

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ फीत कापून करण्यात आला. स्वागतपर भाषणात बहुजन विकास आघाडीचे युवा नेते रणजितसिंह पाटील म्हणाले,शिरोळ तालुक्यात २ हजार कोटींची कामे आणणारे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या इतिहासात राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडेच पाहावे लागेल.सर्व जाती-धर्माच्या भिंती मोडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे.विधानसभा निवडणुकीत शिरोळ शहर व मौजे आगर येथे एक नंबरची मते देणार असल्याचे सांगितले तसेच शिरोळ तालुक्यातील जनता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठीशी उभी असून येणाऱ्या २३ नोव्हेंबरला आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय निश्चित आहे,असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!