आमदार यड्रावकर यांना पॅंथर आर्मी व परिवर्तनवादी संघटनेचा जाहीर पाठिंबा

Spread the love

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पॅंथर आर्मी व परिवर्तनवादी संघटनेने दिला जाहीर पाठिंबा

शिरोळ / प्रतिनिधी

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे.शिरोळ तालुक्यात बहुजन समुदायाच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांमध्ये डॉ.यड्रावकर यांचे महत्वाचे योगदान आहे.त्यांच्या विकसनशील नेतृत्वामुळे शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे.आमदार यड्रावकर हे समाजातील उपेक्षित व वंचित घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांपैकी एक असून, त्यांचा समाजासाठी असलेला दृष्टिकोन आणि तळमळ विशेष लक्षवेधक असल्याचे संतोष आठवले व अमोल कुरणे यांनी सांगून अशा नेत्याला विकास करण्याची संधी यापुढेही देण्यासाठी पॅंथर आर्मी व परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!