अखेर त्या विहिरीतील मगरीला जेरबंद करण्यात प्राणिमित्रांना यश
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नांदणी रोड जवळ असणाऱ्या पाटील समाजाच्या विहिरीत गेली आठ दिवस मगर आली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.विहिरीत पाणी असल्याने मगरीस जेरबंद करण्यास प्राणी मित्रांना अडथळा निर्माण होत होता.अखेर शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास 7 फूट लांबीच्या अजस्त्र मगरीला जेरबंद करण्यास प्राणी मित्रांना यश आले आहे.
शिरोळ शहरातील अजिंक्यतारा मंडळ जवळ पाटील समाजाच्या खाऱ्या विहिरीत मगर आली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण पसरले होते.दरम्यान प्राणी मित्र अनिल माने व त्यांच्या सहकारी यांना अजस्त्र मगरीला जेरबंद करण्यास प्रयत्न केला.मात्र माणसांची चाहूल लागताच मगर पाण्यात बुडत असल्याने पकडण्यास अडथळा येत होता.त्यामुळे विहिरीतील पाणी विद्युत मोटरच्या साह्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तुषार पाटील व अजिंक्यतारा मंडळाच्या कार्यकर्त्यानी गेली चार दिवस विहिरीतील पाणी काढण्यासाठी परिश्रम घेतले.पाणी कमी झाल्याने प्राणी मित्र अनिल माने व त्यांच्या सहकारी यांच्या आठ दिवसाच्या अथक प्रयत्नाला यश आले आणि शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विहिरीतील अजस्त्र जिवंत ७ फूट मगरीला जेरबंद केली.सदरची मगर कोल्हापूर वन विभागाचे अरुण खामकर व प्रदीप सुतार यांच्या ताब्यात देण्यात आली.यावेळी तुकाराम पाटील, मालोजीराजे निंबाळकर,साद शेख,विश्वजीत आवळे, राकेश मुलाणी,अतुल माने यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतली.