शिरोळ / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते स्वाभिमानी पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या पक्षात प्रवेश केले आहेत.त्यामुळे शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येक गावात खिंडार पडत आहे.याची गंभीर दखल घेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.मात्र मनातूनच स्वाभिमानीचे नेतृत्व काढून टाकलेल्या कार्यकर्त यांनी स्वाभिमानी मध्ये परत येण्यास स्पष्ट नकार देत आम्ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे यापुढील नेतृत्व स्वीकारले असे माजी खासदार राजू शेट्टी यांना स्पष्ट केल्याने मनधरणी करण्यासाठी गेलेले शेट्टी यांना नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यास अपयश आल्याचे दिसून आले.दरम्यान नाराज कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्याशी आज संपर्क साधला असता ते म्हणाले आम्ही अनेक वर्षे स्वाभिमानी संघटनेत प्रामाणिक काम केले आहे.मात्र वेळोवेळी आम्हाला स्वाभिमानी संघटनेत दुजाभाव मिळत गेला,तसेच स्वाभिमानी संघटनेची प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका मांडत असल्याने सच्चा कार्यकर्त्यांवर नेहमीच अन्याय होत आहे.त्यामुळे मनधरणीसाठी रात्री आलेल्या राजू शेट्टी यांना आम्ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोबत गेलो आहे. त्यामुळे आता पुन्हा स्वाभिमानी मध्ये घर वापसी करण्याचा प्रश्नच येत नाही असा स्पष्ट सांगितले आहे.तसेच सोशल मीडियावर शिरोळ तालुक्यातील नाराज कार्यकर्ते पुन्हा स्वाभिमानी मध्ये घर वापसी असा मेसेज वायरल होत असल्याने अशी कोणतीही भूमिका मी घेतलेले नाही आम्ही आज सकाळी 11 वाजता आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून आम्ही तुमच्या सोबतच आहोत आम्ही कुठेही गेलेलो नाही असे सांगणार आहोत असेही बालीघाटे यांनी सांगितले.