अर्जुनवाड – घालवाड दरम्यान असणाऱ्या नागरी वस्तीत सहा फूट लांबीची जिवंत मगर
फिरत आल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.तब्बल तासभराच्या अथक प्रयत्नानंतर प्राणीमित्रांनी मगरीला जेरबंद करण्यात यश आले.सदरची मगर रात्री उशिरा कोल्हापूर वनविभागाच्या ताब्यात दिली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अर्जुनवाड – घालवाड दरम्यान असणाऱ्या मगदूम मळ्याशेजारी रोडवर आज गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंदाजे सहा फूट लांबीची जिवंत मगर रस्त्यावरून फिरत असताना ग्रामस्थांना दिसली. स्थानिक ग्रामस्थांनी शिरोळ येथील प्राणिमित्र अनिल माने यांना संपर्क करून सदर मगर आल्याची माहिती दिली.प्राणी मित्र अनिल माने यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह अर्जुनवाड भेट देऊन तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नाने जिवंत मगरीला पकडण्यात यश आले.सदरची मगर रात्री उशिरा वनरक्षक खामकर व प्रदिप सुतार यांच्या ताब्यात दिली.प्राणी मित्रांच्या धाडसामुळे अर्जुनवाड करानी सुटकेचा निस्वास सोडला.असलातरी मगरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.यावेळी प्राणिमित्र तुकाराम पाटील, मालोजीराजे निंबाळकर, विशाल पाटील, प्रवीण इंगळे,साद शेख,विश्वजीत आवळे यांच्यासह अर्जुनवाड ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.