“मोठ्या निर्णय” सर्व पानपट्ट्या बंद,महिला वर्गातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव

Spread the love

मोठ्या निर्णय सर्व पानपट्ट्या बंद,महिला वर्गातून समाधान व्यक्त

शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील पानपट्टीमध्ये माव्यासाठी लागणारी सुगंधी सुपारी,पत्ती,गुटखा राजरोसपणे विक्री केली जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्याची दखल घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याने शहरातील सर्व पानपट्टी व्यवसायिकांना दिवाळी व निवडणूक या पार्श्वभूमीवर पानपट्टी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिरोळ पोलिसांच्या या धाडसी निर्णयामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.शिरोळ शहरात पानपट्टीमध्ये मावा,सुगंधी पत्ती, गुटखा,पान तयार करण्यासाठी विविध प्रकारचे वापरणारी सुगंधी पत्ती याचे सेवन करणाऱ्याची संख्या शहरात मोठी झाली आहे.पानपट्टीमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 14 ते 24 वयोगटातील तरुणांचा गराडा पडलेला असतो.त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत.काही ठिकाणी चोरून अमली पदार्थव नशेच्या गोळ्याची विक्री होत आहे.नशेच्या सेवनामुळे अनेक ठिकाणी वादही झाले आहेत.शासनाची बंदी असून सुद्धा सर्वच पानपट्टीत मावा त्यासाठी लागणारे सुगंधी पत्ती,सुगंधी सुपारी राजरोसपणे उघड्यावर विक्री करून यातून दिवसाला लाखोंची उलाढाल होत आहे.मात्र त्यांच्या पैशाच्या हव्याचा पोटी अनेक तरुण देशोधडीला लागत आहेत.याची चिंता पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.शहरात पण सहज मिळणाऱ्या या मावा पत्ती,सुगंधी सुपारी यावर कोण निर्बंध घालणार? असा प्रश्न महिला वर्गातून व्यक्त केला जात होता.दरम्यान याबाबत “आचारसंहिता नावालाच” अवैध धंदे जोमात या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिरोळ पोलिसांनी शहरातील सर्व पानपट्टी धारकांना पानपट्टी बंद ठेवण्याचे ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.त्यानुसार शहरातील सुमारे ५० हुन अधिक पानपट्ट्या गेली दोन दिवस बंद आहेत.पानपट्ट्या बंद असल्याने अनेक तरुणांना काही प्रमाणात व्यसनापासून काही प्रमाणात दूर राहिल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.तसेच शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांचेही आभार मानले जात आहेत.मात्र माव्याची चोरून विक्री करणाऱ्यांवर ही कडक कारवाई व्हावी तसेच ही कारवाई तात्पुरती न करता कायमस्वरूपी या सुगंधी पानसुपारी,मावा विक्रीवर बंदी घालावी अशी माफक अपेक्षाही पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
————————————————–
मावा सुगंधी सुपारी गुटखा बंद,मात्र देशी दारू विक्री जोमात
…………………………………………………
शिरोळ पोलीस ठाण्याने शिरोळ शहरातील सर्व पानपट्टी धारकांना आपले व्यवसाय पानपट्ट्या बंद ठेवण्याच्या सक्त सूचना दिले आहेत.मात्र नांदणी,टाकवडे,शिरोळ,मौजे आगर फाटा आधी ठिकाणी खुलेआम देशी दारूची विक्री केली जात आहे.दारूच्या व्यसनाने ऐन दिवाळी सणामध्ये घरात वादाचे प्रसंग घडत असल्याने वातावरण बिघडत आहे.
—————————————————
खिशात दररोज माव्याच्या तीन-चार पुड्या सापडायच्या मात्र दोन दिवस माव्याची पुडी सापडली नाही,मुलाला विचारले मावा सोडला का? दिवसातून एकच पुडी पुरवून खात आहे.यामुळे पानपट्टी बंदमुळे मुलाचे ८० टक्के व्यसन कमी झाले.
 —– महिला पालक —–
error: Content is protected !!