“ब्रेकिंग बातमी” जयसिंगपुरात आमदार सतेज पाटलांनी भाकरी फिरवली,यड्रावकर गटाला मोठा धक्का 

Spread the love

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मोठे खिंडार

आमदार सतेज पाटलांनी जयसिंगपूरात भाकरी फिरवली
नगरसेवक गुंडाप्पा पवार,बबलू नलवडे,महेश भोसले यांचा गणपतराव पाटील गटात जाहीर प्रवेश
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील विधानसभा निवडणुकीचा रंग आत्तापासूनच दिसू लागले असून जयसिंगपूर शहरातील वडर समाजाचे मोठे नेते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे समर्थक माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार,बबलू नलवडे, महेश भोसले यांनी आपल्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसह जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता इचलकरंजी येथील जाहीर सभेत कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.जयसिंगपूर शहरात आमदार यड्रावकर गटातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने आमदार सतेज पाटलांनी जयसिंगपूरात भाकरी फिरवली असा संदेश जयसिंगपूर शहरात सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकारण आता तापत आहे.या पक्षप्रवेशावेळी जेष्ठ नगरसेवक सर्जेराव पवार,चंद्रकांत जाधव बापू,नगरसेवक नितीन बागे,वरुण पाटील,वरद पाटिल,राज पवार,पवन सुतार,रवी वैध,संतोष नलवडे,सतीश माने,लखन नलवडे, सागर धोत्रे, सतीश नलवडे,विलास जाधव,राहूल पवार,दिलीप धोत्रे,यशवंत पवार,अजय शेळके,व्ही.बॉईज शाखाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!