कॉन्ट्रॅक्टरांचे नाराजीनाट्य एक खबरबात
दादांच्या मिटींगला आम्ही का जावावं ?
शिरोळ विधानसभेसाठी दोन दादा आणि एक साहेब अशी प्रमुख तिरंगी लढत निश्चित झाली आहे.तिघांच्याही जोर बैठका जोरात सुरू आहेत त्यातील दादांनी तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सोबत बैठक आयोजीत केली आहे.सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना निरोपही गेले आहेत.यातील दोन कॉन्ट्रॅक्टर मित्र काल भेटले. दादांच्या मिटींगला जायच कि नाही आशा व्दीधा अवस्थेत ते आहेत.चर्चेतल्या ओघात त्यांनी दादांवर नाराजी व्यक्त केली.जमिन क्षारपडमुक्तीचं ; कारखाना विस्तारीकरणाची कोट्यावधीची कामं दादांनी केली. त्यासाठी त्यांचे त्यांचे ठरवावीक आणि मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरांनाच त्यांनी ती कामं दिली.आणि आता निवडणूकीला उभं राहील्यावर आमची त्यांना आठवण झाली.आम्ही का जावावं ? असा त्यांच्या बोलण्याचा सुर होता.त्याऊलट साहंबांनी गेल्या पाचवर्षात दुजाभाव न करता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला छोटे मोठे का असेना पण कांहीं ना कांही काम दिले.त्यातून साहेबांचा मोठेपणा दिसून आला.यावेळी साहेबांच्या बरोबरच राहीलेल बरं… असा त्यांचा एकंदरीत सुर होता.कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकांऱ्यांचं अस मत असेल तर दादानी नियोजीत मिटींगमध्ये काहीही आश्वासने दिली ; तर त्यावर कॉन्ट्रक्टर असोसिएशनचे पदाधिकारी कितपत विश्वास ठेवणार ? हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.