शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी ५ अर्ज अपात्र
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची बुधवारी सकाळी 11 वाजता छाननी प्रक्रिया पूर्ण झाली.यामध्ये दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी पाच जनांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. अर्जासोबत कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणावरून यामध्ये ५ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.बुधवारी अर्ज छाननी प्रक्रियेत प्रवीणकुमार मानगावे,सुनील कुरुंदवाडे,दिगंबर सकट,बजरंग कुंभार,बाळासो कांबळे हे अर्ज अवैध ठरले आहेत.त्यामुळे एकूण २३ जणांचे ३० अर्ज निवडणुकीसाठी शिल्लक राहिले आहेत.दरम्यान येत्या ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार आहे. येथील तहसील कार्याच्या निवडणूक विभागात आज बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अर्ज छाननी प्रक्रिया सुरू झाली.यावेळी उमेदवार व त्यांच्या समर्थकासह कायदेतज्ञ यांची उपस्थिती होती.