“इचलकरंजीत महायुतीत बिनसले”अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षाचा अपक्ष अर्ज दाखल

Spread the love

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे इचलकरंजी शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले चोपडे यांनी आज मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.पाण्याचे प्रश्न मला माहित आहेत त्यामुळे विठ्ठल चोपडे यांनी पाण्याच्या घागरीची कावड घेऊन इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आम्हीच मिटवू अश्या घोषणा देत अनोख्या पद्धतीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.आज एका सर्वसामान्य घरातील उमेदवार म्हणून विठ्ठल चोपडे यांच्याकडे पाहिले जाते.सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी राहील मी सध्या कोणावर टीका करणार नाही पण सर्वसामान्य मतदार राजा मलाच कौल देईल व माझा विजय निश्चित होईल असा आत्मविश्वास विठ्ठल चोपडे यांनी व्यक्त केला.यावेळी विठ्ठल चोपडे समर्थक सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!