“मोठी कारवाई” अर्जुनवाड चेकनाक्यावर ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

अर्जुनवाड चेकनाक्यावर ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिरोळ / प्रतिनिधी
मिरज-शिरोळ मार्गावरील अर्जुनवाड ता.शिरोळ येथील चेकनाक्यावर विनापरवाना व बेकायदेशीरपणे वेग-वेगळ्या कंपनीची दारू व चारचाकी वाहन असे 4 लाख 8 हजार 575 रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी हस्तगत केला आहे.याप्रकरणी सुनिल आप्पासो पाटील (वय 39 रा.खंडेराजुरी ता.मिरज जि.सांगली) याच्याविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करण्यात आली.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अर्जुनवाड येथे कृष्णा नदीच्या काठावर चेक नाका सुरू करण्यात आला आहे. यात शिरोळ मिरज मार्गावरील सर्व वाहनाची बुधवारी स्थिर निरीक्षण पथकप्रमुख साहिल लगिवाले,पथक सहाय्यक ज्ञानेश्वर कंदले, पोलिस हेड कॉन्स्टेबल रहिमतुल्ला पटेल, फोटोग्राफर प्रविण कांबळे यांच्यासह पथक वाहने तपासणी करताना चारचाकी वाहनांत हा मुद्देमला मिळून आला.घटनास्थळी तहसिलदार अनिलकुमार हेळकर, शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथकांने पाहाणी केली.याबाबतची फिर्याद पोलिस हेड कॉन्स्टेबल रहिमतुल्ल पटेल यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.
error: Content is protected !!