“मोठी दुर्घटना” ८ कामगारांची व्हॅन उलटली; ३ कामगार जखमी

Spread the love

हेरवाड-अब्दुललाट मार्गावर लक्ष्मी स्टॉपजवळ ८ कामगारांना घेऊन जाणारी व्हॅन आज सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता उलटली,ज्यात ३ कामगार जखमी झाले आहेत.यात एका महिलेचाही समावेश आहे.क्लजमध्ये पिशवी अडकल्याने ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे गाडी रस्त्यावर पलटी झाली. घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार, ड्रायव्हर गाडी नियंत्रित करण्यात अपयशी ठरला आणि त्यामुळे हा अपघात घडला.अपघातानंतर व्हॅनमध्ये असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखून बाहेर पडण्यास प्राधान्य दिले.ज्यामुळे मोठा अपघात टळला.सुदैवाने,मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली नाही.जखमींमध्ये काहींना किरकोळ मार लागला असून, त्यांना तातडीने नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!