शिरोली पोलिसाच्या “या” कारवाईत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करणार्या महिला व माव्यासाठी लागणारी पत्ती विक्री करणाऱ्यावर कारवाई

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

संभापुर ता हातकणंगले येथे बेकायदेशीरपणे विना परवाना देशी विदेशी मद्यविक्री करणाऱ्या महिलेवर तर माव्यासाठी लागणारी पत्ती वाहतुक करणाऱ्यावर एकावर असे दोन ठिकाणी शिरोली पोलिसानी कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ६६ हजारांचा मुददेमाल जप्त केला महिला व पत्ती वाहतुक करणाऱ्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे .बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या आरोपी महिलेचे नाव जयश्री कृष्णात भोसले वय ५४ वर्षे रा. भोसले गल्ली तासगाव रोड संभापुर असे असून हि महिला देशी विदेशी दारु, बिअर घराच्या व्हरांड्यात उघड्यावर विना परवाना बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असता शिरोली पोलिसानी कारवाई करत ९१ हजार ५०५ रूपयांच्या देशी , विदेशी दारूसह मुददेमाल जप्त केला हि कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ( ई) प्रमाणे करण्यात आली .तर शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील एकता कॉलनीत राहणारा जावेद जहाँगिर मिरजकर वय ३९ हा आपल्या दुचाकी इलेक्ट्रिक गाडीवरून माव्यास लागणारी पत्ती वाहतुक करताना पोलिसानी जाफरानी काटा येथे आडवून त्याची चौकशी केली असता सिमेंटच्या पिशवी माव्यासाठी लागणारी ५ हजार रूपयांची अडीच किलो वजनाची पत्ती व इलेक्ट्रिक दुचारीसह एकूण ७५ हजारांचा मुददेमाल जप्त केला हि कारवाई सिगारेट अॅन्ड टोबॅको प्रोडक्टस अॅक्ट 2003 चे कालम 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!