छत्रपती शिवाजी विद्या मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण
शिरोळ / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाजातील गोरगरीब वंचितांचीच मुलं शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या रोटरी क्लब ऑफ शिरोळने छत्रपती शिवाजी विद्या मंदिर या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले या कॅमेर्यांचे लोकार्पण गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.शाळेस कॅमेरे बसवून दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी, सचिव डॉ. अंगराज माने,खजिनदार दिनेश माने-गावडे,सदस्य नितीन शेट्टी, सचिन देशमुख, युवराज जाधव, बापूसाहेब गंगधर, सुनील सन्नके यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना रोटे नितीन शेट्टी म्हणाले की जिल्हा परिषद शाळेमध्ये गरिबांचीच मुलं शिक्षण घेत असतात त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फ दिवाण कोळी यांनी पुढाकार घेऊन तात्काळ रोटरी क्लबच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले यामुळे कोळी यांचेही शाळेतील सर्व शिक्षकांनी कौतुक केले.या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फ दिवाण कोळी मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी गायकवाड,अध्यापिका सौ शशिकला पाटील,सौ सविता जाधव, सुरेखा यळगुडे, श्रीमती जयश्री पेटकर,अध्यापक यशवंत कांबळे, यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.