पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील फरांडे बाबांची ऐतिहासिक भाकणूक

Spread the love

पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत आज सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सहा लाख भाविकांनी विठ्ठल बिरदेवाच्या नावान चांगभल म्हणत उधळला 50 टन भंडारा केली.तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक पार पडली.हेडाम खेळत मंदिराच्या सभागृहात फरांडे बाबांची ऐतिहासिक भाकणूक

केली.या भाकणुकीत फरांडे बाबांनी नऊ दिवसाचे कावड फिरेल चांगला राहील,धारण चढती राहील महागाई वाढेल,राजकारणात उलथापालत होऊन भगवा फडकेल,भारताचे समान नागरी कायद्याकडे वाटचाल,बळीराजा रोहिणीचा पाऊस मृग नक्षत्राचा पेरा,भारताचची महासत्ताकडे वाटचाल,बहिण भावाच्या नात्यातील सलोखा कमी होतील,देवाची सेवा करील त्याची रोगराई कमी होईल,मी स्वतः मेंडका होऊन हातात वेताची काठी घेऊन माझी सेवा करणाऱ्या भक्ताचे मी सदैव संरक्षण करीन अशी भाकणूक फरांडे बाबांनी यांनी केली. भाविकांनी खारीक-खोबरे, लोकरीची प्रचंड प्रमाणात उधळण केली.यावेळी सम्पूर्ण परिसर पिवळा धमक सोनेरी झाला होता.

error: Content is protected !!