शाहू वाचनालयात भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी
शिरोळ / प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिरात माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन सौ सुप्रिया सनीसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.दिप प्रज्वलन उद्योगपती सनीसिंह पाटील छायाचित्रकार सुनील पोळ अंक विक्रेते चिदानंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिरोळभूषण आण्णासो माने गावडे हे होते. ग्रंथालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव,संचालक आप्पासो पुजारी,नानासाहेब जाधव, रामचंद्र पाटील, सचिन माळी, अशोक गंगधर, सौ जयश्री पाटील, विजय माने-देशमुख, रणजित माने,बाळासो जाधव,मंदार महात्मे, गणपतराव माने, खंडेराव हेरवाडे, ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहाय्यक ग्रंथपाल सौ रुपाली कुंभार, बाबुराव मोरे यांच्यासह वाचनालयाचे सभासद,विद्यार्थी,वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.