शाहू वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिरात आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनास वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.माजी राष्ट्रपती व भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त राजश्री शाहू नगर वाचन मंदिर येथे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन सौ सुप्रिया पाटील सनीसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.दिपप्रज्वलन उद्योगपती सनीसिंह पाटील छायाचित्रकार सुनील पोळ अंक विक्रेते चिदानंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रंथ प्रदर्शनाचे उद्धाटन उद्योजक सनीसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिरोळभूषण आण्णासो माने गावडे हे होते.ग्रंथालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव, संचालक आप्पासो पुजारी, नानासाहेब जाधव, रामचंद्र पाटील, सचिन माळी, अशोक गंगधर, सौ जयश्री पाटील, वि‌जय माने- देशमुख, रणजित माने,बाळासो जाधव, मंदार महात्मे, गणपतराव माने, खंडेराव हेरवाडे, ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहाय्यक.ग्रंथपाल सौ रुपाली कुंभार, बाबुराव मोरे यांच्यासह वाचनालयाचे सभासद, विद्यार्थी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!