वरिष्ठ नेत्यांशी भेट घेऊन भूमिका मांडणार -विक्रमसिंह जगदाळे

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. मात्र काँग्रेस आणी शिवसेनेकडून आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही.त्यांना विश्वासात घेतले जात नाही.शिरोळ तालुक्यात आमच्या पक्षाची ताकद मोठी असल्याने पक्षाच्या वतीने सौ.स्नेहा देसाई यांनी निवडणूक लढवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या संदर्भात लवकरच वरिष्ठ नेत्यांशी भेट घेऊन आमची भूमिका मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह उर्फ बंटी जगदाळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!