हेरले अपघात एक ठार,दोन जखमी…

Spread the love

पु.शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

राहुलच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात करणाऱ्यांची संख्या एक की दोन.. संशयाच्या भोवऱ्यात……

हेरले अपघात एक ठार,दोन जखमी…

भरधाव मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हेरले इथला अन्य एक 39 वर्षीय मोटर सायकल स्वार राहुल गुणधर गुमताज याचा जागीच मृत्यू झाला. तर 23 वर्षीय अभिजीत अण्णाप्पा हनगंडे हा गंभीर तर रोहन राजेंद्र घुणके हा किरकोळ जखमी झाला. राहुलच्या निधनामुळे गुमताज कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्याच्या पश्चात आजारी वडील, पत्नी आणि तीन लहान मुले असल्याने गावामधून हळहळ व्यक्त होत आहे. राहुल गोमता याला धडक देणाऱ्या गाडीवर अभिजीत हनगंडे आणि रोहन घुणके हे दोघे होते पण हातकणंगले पोलिसांच्या डायरीमध्ये रोहन घुणके याला अपघाताचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याची नोंद असल्याने प्रत्यक्ष अपघात पाहणाऱ्यांच्या मध्ये संशय निर्माण झाला आहे. अपघातांमध्ये सुद्धा राजकीय वजन वाढू लागल्याने मृत व्यक्ती आणि कुटुंबांच्यावर अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या म्हसोबा माळ परिसरात राहुल गुणधर गुमताज हा पत्नी, वडील, आणि तीन मुलासह राहत होता. तो शिरोली एमआयडीसी मध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होता. तो नेहमीप्रमाणे कामावर जाऊन घरी परत आला होता. रात्री साडेनऊच्या दरम्यान तो मुलांना खाऊ आणण्यासाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हेरले माळभाग फाट्यावर असणाऱ्या हॉटेल क्लासिक चायनीज मध्ये गेला होता. तेथून तो आपल्या मोटरसायकल वरून घरी परत जात होता. याच वेळी सांगलीच्या दिशेने भरधाव आलेल्या मोटर सायकल स्वार अभिजीत अण्णाप्पा हनगंडे याने पाठीमागून जोराची धडक दिल्याने राहुल गुमताज हा रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला. तर हेरले इथला अभिजीत हानगंडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघाताचा साक्षीदार असणारा रोहन राजेंद्र घुणके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत तक्रार दाखल होण्यास आणि पोलिसांकडून माहिती मिळण्यास विलंब झाल्याने अपघाताबाबत तर्क वितरकांना उधान आले आहे.या
अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.

error: Content is protected !!