शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस संयोजन समितीच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या उत्सव व उरुसासाठी लोकवर्गणी संकलन करण्याचा प्रारंभ आज गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला.येथील श्री बुवाफन महाराज मंदिर आणी हजरत नुरखान बादशाह दर्गाह परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत पावती पुस्तकाचे पूजन करून लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली.नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस संयोजनाचा मान येथील ओन्ली गजराज मंडळास मिळाला असून केतन कृष्णा चव्हाण भाट हे उत्सव व उरुस संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत.गुरुवारी सकाळी लोकवर्गणी गोळा करण्यासाठी लागणाऱ्या पावती पुस्तकाचे पूजन व लोकवर्गणी गोळा करण्याचा शुभारंभ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,ज्येष्ठ नागरिक आयझाक भोरे,सुभाष आवळे यांच्या हस्ते पावती पुस्तकाचे पूजन करण्यात आले.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव,दरगु गावडे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,माजी सरपंच गजानन संकपाळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी सरपंच अर्जुन काळे,युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, विजयसिंह माने-देशमुख,विराजसिंह यादव,राहुल यादव, श्री दत्त वाहतूक संघटेनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील-नरदेकर,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडूरंग माने,माजी नगरसेवक पंडीत काळे,शरद उर्फ बापू मोरे,इम्रान अत्तार, दयानंद जाधव,श्रीवर्धन माने-देशमुख, विजय आरगे,उद्योगपती जब्बार मेस्त्री,प्रतिक जगदाळे, उल्हास उत्तमराव पाटील,रमेश पाटील, बाळासाहेब कोळी,बापूसाहेब गंगधर,फत्तेलाल मेस्त्री, मन्सूर शेख,महादेव बिसुरे, नेताजी जाधव,बजरंग काळे,अमोल हिरेमठ,अमर रजपूतसंदीप माने, उमेश माने,ह.भ.प.संपत महात्मे, बुवाफन उत्सव नुरखान बादशहा ऊरुस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण (भाट),उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे,अवधुत उर्फ बाबा देसाई- पाटील,चंद्रकांत भाट,दत्तात्रय बाबर,दीपक भाट, प्रशांत चुडमुंगे,सुभाष भाट,बाजीराव कोळी, सुनील कोळी,गजानन कोळी,संकेत बाबर, विनायक कोळी,अनिल काळे,मोहन यादव, प्रफुल कोळी,लालासो गावडे,उत्तम भाट,राहुल कोळी,साहिल भाट,जयदीप काळे,निरंजन यादव,उमेश गावडे,अंकुश काळे,पारस भाट, प्रसाद यादव,जयेश काळे,सागर भाट, नवनाथ भाट, बुधाजी भाट,दीपक बिसुरे,रवी काळे,मुर्गेंद्र यादव, राकेश काळे, विशाल काळे, सागर काळे, सौरभ काळे, ऋषिकेश भाट, निलेश कदम, नागेश भाट,विशाल भाट,राजेंद्र पवार यांच्यासह उत्सव व उरूस संयोजन समितीचे पदाधिकारी ओन्ली गजराज मंडळ कोळी गल्ली, श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळ यादव चौक भाट गल्ली,जयहिंद मंडळ काळे गल्ली या तिन्ही मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिरोळमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.