महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप नाम फलकाचे उद्घाटन- शिवसेना शहर प्रमुख दिपक कोळी

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी कोळी यांच्या जयंतीनिमित्त कोळी समाजाच्या वतीने आज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून समस्त कोळी समाज यांच्या वतीने कुंभोज येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान उपसरपंच अशोक आरगे उपस्थित होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक कोळी, विजय कोळी विठ्ठल कोळी, बबन कोळी, उमेश आरगे, वसंत कोळी, वैभव कोळी , महेश कोळी, योगेश कोळी, प्रविण कोळी, निवास कोळी, सतीश कोळी, ओमकार कोळी , विनायक कोळी, विशाल कोळी, सौरभ कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!