कुंभोज बाजारपेठेत चाललय तरी काय?
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकलंगले येथे आठवड्यातून बुधवार व रविवारी हे दोन आठवडी बाजार भरतात परिणामी बाजार झाल्यानंतर सदर बाजारपेठेत येणारे व्यापारी मात्र उर्वरित शिल्लक नाशवंत माल व नाशवंत वस्तू बाजारपेठेत मेन रोडवर कडेला टाकून जातात सध्या या मेन रोडवर नाशवंत व कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात ठीक साठले असून त्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कुंभोज बाजारपेठेत दीपक चौक हा मेन चौक असून या चौकातून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात त्याचबरोबर अनेक शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही प्रवास याच मेन रोड वरून होतो, त्याच रोडवरती बुधवारी व रविवारी आठवडी बाजार भरवला जातो, परिणामी बाजार झाल्यानंतर आठवडी बाजारात असणारा वेस्टेज माल, केर कचरा व कुजलेला भाजीपाला व्यापारी लोक रस्त्याच्या कडेला आणून टाकत असल्याने सदर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून याबाबत विद्यार्थी व पालकातून संताप व्यक्त होत आहे.यामुळे ग्रामपंचायत कुंभोज यांनी सदर रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सदर कचरा टाकणायाना तेथुन उचल करण्यासाठी त्यांना भाग पाडावे असे मत कुंभोज ग्रामस्थांच्यातून सध्या व्यक्त होत आहे.