दत्तवाडात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

पालखी व कलश मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन.

दत्तवाड / प्रतिनिधी

रामायणकार,आदर्श वर्तनाची बीजे समाजमनावर बिंबविणाऱ्या महान तपस्पी,आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती दत्तवाडमध्ये मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी गावातून महर्षि वाल्मिकी यांच्या पालखीची मिरवणूक काढून मंदिरामध्ये आगमन झाले.सुहासिनींनी कलश घेवून मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या.आबालवृध्द,कोळी जमात बांधवांसोबतच सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.मंदिरात पूजाअर्चा,होमहवन, भजन,आरती होवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जयंती समारोहाच्या यशस्वीततेसाठी कोळी जमातीचे ज्येष्ठ नागरिक,तरुण,महिला यांचे मोलाचे योगदान लाभले.

error: Content is protected !!