शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी नूतन आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यपाल कोट्यातून युवानेते विक्रांत पाटील यांना आमदार म्हणून संधी देण्यात आली.विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नूतन आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.विक्रांत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी नूतन आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.