कुमार घालवाड शाळेत लेखक आपल्या भेटीला व वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांची भेट

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

घालवाड ग्रामस्थांचा उदारपणा व दानत अनोखी आहे.शाळेचा विकास आणि शाळेतील मुलांच्या प्रगतीसाठीच्या हातभाराला तोड नाही.वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत संपादक डॉ.सुनिल पाटील,लेखिका संजीवनी सुनिल पाटील,लेखक मंगेश कोळी व लेखक विठ्ठल कोळी यांनी शाळेस भेट दिली.लेखकांनी मुलांचे उद्बोधन करून शाळेसाठी १०० पुस्तके भेट दिली. त्याचबरोबर रु.पां.माने हायस्कूलचे अध्यापक श्री.वाघमारे सर यांनी २५ पुस्तके भेट दिली.घोलेश्वर पतसंस्था घालवाड चे चेअरमन श्री.गजानन शिवराम मगदूम यांनी रोख ५००० रुपये देणगी दिली.
शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा व विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाले बद्दल अनिल खाडे,विनया खाडे, परशराम खराडे,संतोष साळुंखे यांचे सत्कार करण्यात आले.अंगणवाडी सेविका पदोन्नतीबद्दल सुनिता अमोल साळुंखे यांचाही सत्कार केला.याप्रसंगी सरपंच सतपाल खाडे, माजी सरपंच देवा तात्या इंगळे, पोलिस पाटील सौ.सावित्री तोडकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद खाडे,उपाध्यक्ष सोनाली फडतारे, राजवर्धन सरनोबत,सागर जाधव,दत्तात्रय साळुंखे, मुख्याध्यापक शरद सुतार,अध्यापक बंडू राऊत,सुनिल शिरसाठ,गफार बैरागदार,लक्ष्मीकांत हंकारे,श्री.माकणे यांचेसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!