नरंदे ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप भंडारी यांची बिनविरोध निवड

Spread the love

नरंदे ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप भंडारी यांची बिनविरोध निवड

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

लोकनेते कै.सिताराम आबाजी भंडारी (बापूजी ) पॅनेलचे पॅनेल प्रमुख,शरद साखर कारखाना संचालक पै. अभिजित भंडारी,प्रथम लोकनियुक्त सरपंच मा. रवींद्र अनुसे यांच्या मार्गदर्शना खाली नरंदे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी संदीप भिमराव भंडारी यांची निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी नूतन उपसरपंच संदीप भंडारी यांचा सत्कार यांनी प्रमुख अभिजीत भंडारी व माजी उपसरपंच रवींद्र अनुसे तसेच गावातील बापूजी पॅनलच्या प्रमुख नेते मंडळींच्या वतीने करण्यात आला . यावेळी बोलताना नूतन उपसरपंच संदीप भंडारी यांनी बापूजी पॅनलच्या नेतृत्वाखाली आपण नरंदे गावच्या विकासाची बुलेट ट्रेन गतिमान करू असे आश्वासन दिले. निवडीनंतर संदीप भंडारे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आताषबाजी करून आपला आनंद साजरा केला.यावेळी बापूजी पॅनेल नूतन ग्रामपंचायत सदस्य मा. नितीन कदम, रेखा पाटील , सौ. नयन आवळे. रुपाली अनुसे,कविता भंडारी, पुजा गुरव, संगीता खोत, मयुरी भोरे, तसेच नरंदे सोसायटी संचालक अमित भंडारी, पतंगराव पाटील, आनंदराव भंडारी, कपिल भंडारी, संतोष भंडारी , नागेश भोरे, विद्यानंद पाटील, प्रदीप चौगुले, अनिकेत पाटील, प्रवीण पाटील, केतन पाटील, सागर भंडारी, सिकंदर मुल्लाणी, प्रमोद गिड्डे, बाबासाहेब भंडारी, विनोद भंडारी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!