सौ जयश्री पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील राधा महिला सोशल फौडेंशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ जयश्री जगदीश पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ इंद्रायणी अमरसिंह पाटील यांच्या हस्ते सौ पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या व राधा महिला सोशल फौडेंशन शिरोळच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. जयश्री जगदीश पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र देण्यात आले आहे.सदर निवड पत्र माजी जिल्हा परिषद सदस्या सौ इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते सौ जयश्री पाटील यांना देण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवानेते अजिंक्य पाटील,माजी नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, एन वाय जाधव,सुभाष माळी, अमित उर्फ बंटी संकपाळ, प्रवीणसिंह माने,मारुती जाधव, सुनील माने,मयूर पाटील, किरण माने गावडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या निवडीसाठी सौ जयश्री पाटील यांना विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जगदीश पाटील,उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे, सचिव मेजर प्रा.के.एम.भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!