मारुती जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

येथील श्रीराम मंडळाचे कर्तव्यदक्ष सदस्य आणि युवा सामाजिक कार्यकर्ते मारुती रघुनाथ जाधव-सांगले यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते श्री जाधव यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून येथील राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणी सामाजिक कार्यकर्ते मारुती रघुनाथ जाधव-सांगले यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र देण्यात आले आहे.सदर निवड पत्र माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते मारुती जाधव यांना देण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ इंद्रायणी अमरसिंह पाटील, युवानेते अजिंक्य पाटील,माजी नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, एन वाय जाधव,सुभाष माळी, अमित उर्फ बंटी संकपाळ,प्रवीणसिंह माने, मारुती जाधव, सुनील माने, मयूर पाटील, किरण माने गावडे, चंद्रकांत दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या निवडीसाठी मारुती जाधव यांना श्री गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव जाधव-सांगले यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!