१७ ऑक्टोबरला जयसिंगपूरात होणार महर्षि वाल्मिक जयंती

Spread the love

अभिषेक,महापूजा,मूर्ती पूजन,पुष्पवृष्टी महाआरतीचे आयोजन

जयसिंगपूर / प्रतिनिधी

  सकल आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत महर्षि वाल्मिकी यांची जयंती दरसाल मोठया उत्साहात साजरी केली जाते.गुरुवार दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी जयसिंगपूर शहर व परिसर कोळी समाज संघटनेमार्फत कोल्हापूर बायपास रोड विभूते शाळेजवळील समाज मंदिरात संपन्न होणार आहे.सकाळी ८ : १५ वाजता महर्षि वाल्मिकी यांच्या मूर्तीस अभिषेक व महापूजा, मूर्तीपूजन,पुष्पवृष्टी,महाआरती सौ.व श्री.संतोष सिद्राम कोळी, अभिजीत रविंद्र कोळी,सुहाग आण्णासो कोळी यांच्या शुभहस्ते होणार आहे.सकाळी ९ ते दुपारी १ वाजता संत सेना महिला भजनी मंडळ जयसिंगपूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी ११ वाजता हळदी -कुंकू समारंभ,प्रसाद व अल्पोपहार होणार आहे. सकाळी ११ वाजून १५ मिनिटानी समाजमंदिरास अनमोल सहकार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मानसिंगराव शंकर भोजे,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आप्पासाहेब शंकर कोळी,मुक्त सैनिक सोसायटी संभाजीपूर चे चेअरमन दत्तात्रय भाऊ कोळी यांचा सत्कार होणार आहे.तरी महर्षि वाल्मिक जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शहाजी कोळी, लक्ष्मण कोळी, कुमार नाईक,गजेंद्र कोळी,डॉ.विश्वास कोळी यांनी केले आहे.

error: Content is protected !!