उदगांवमध्ये घरावर पडली वीज,परिसरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्या
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर व उदगांव परिसरात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाट होऊन उदगांव येथील गावभागातील कदम गल्लीतील सुभाष कदम यांच्या घरावर वीज पडल्याने मोठा धक्का बसला.विजेच्या धक्याने अनेक घरातील टीव्ही यासह इलेक्ट्रिक वस्तू जळाल्या सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र वीज पडलेल्या ठिकाणी स्लॅबला तडे गेले असून तर एक सोलर फुटला आहे.शिरोळ तालुक्यात सोमवारी दिवसभर उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी पावसाचे वातावरण झाल्याने समाधान व्यक्त केले. त्यानंतर सातच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला.मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट होत कोठेही पाऊस न पडता उदगाव येथे वीज पडली.सुभाष कदम यांच्या स्लॅबच्या घरावर वीज पडल्याने मोठा आवाज होऊन धक्का बसला.यात कदम यांच्या स्लॅबला तडे गेले असून सोलर पूर्णपणे फुटला. दुसरीकडे आणि घरातील टीव्ही व इलेक्ट्रिक वस्तू जळाल्या.वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता.