कंत्राटी विशेष शिक्षकांचे सरकारी सेवेत समायोजन विशेष शिक्षकांत समाधानाचे वातावरण.
शिरोळ / प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी विशेष शिक्षकांना तुटपुंज्या मानधनावर विविध प्रकारची कामे करावी लागत होती.त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा सुरु होता.अखेर शासनाने कंत्राटी विशेष शिक्षकांना केंद्र स्तरावर समायोजन करुन सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याबद्दल शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांचे वतीने विशेष शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विशेष शिक्षक शंकर बरगाले यांनी प्रशासन, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत,अनिल ओमासे, एन.व्ही.पाटील,केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधवर, आण्णा मुंडे,रियाजअहमंद चौगले,सुरेश कोळी, सलीम आत्तार,यशवंत पेठे,सुभाष कुरुंदवाडे, प्रकाश खोत,संदीप कांबळे,नितीन कांबळे,अपर्णा मोकाशी, प्रतिमा माने यांचेसह कार्यालयीन स्टाफ उपस्थित होता.