शिरोळ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रास बॅरिस्टर खर्डेकरांचे नाव द्या : अनिलराव यादव
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील औद्योगीक प्रशिक्षण (आय.टी.आय) केंद्राला शिक्षण महर्षी माजी खासदार बॅरिस्टर. बाळासाहेब खर्डेकर यांचे नांव देण्यात यावे अशी मागणी शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने शासनाच्यावतीने चालविल्या जात असलेल्या औद्योगीक प्रशिक्षण केंद्राना समाजामध्ये आदर्शवत काम केलेल्या व्यक्तीची नावे देण्याचा निर्णय घेवून समाजासमोर आदर्श ठेवणे बरोबरच त्या व्यक्तीला न्याय देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. अशापैकी निस्वार्थीपणे समाजासाठी झोकुन देवून आपले आयुष्य कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी समाजासाठी खर्ची घातलेल्या शिक्षणमहर्षी माजी खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, (दानोळी) यांचे नांव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी.आय) शिरोळला देवून त्यांनी केलेल्या कामाला न्याय द्यावा अशी मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे या निवेदनाच्या प्रती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्र हसन मुश्रीफ, आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी, कोल्हापूर सरपंच ग्रामपंचायत, दानोळी यांना देण्यात आले आहे.