कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाडचे हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतिक असलेले हजरत गौस-पाक-म्हाबूसुभानी वली यांचा उरूसाला सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात सुरवात झाली.हजरत दौलत शहावली दर्गा येथुन सायंकाळी 7 वाजत गाजत मानद मुतवल्लींच्या हस्ते संदल आणून खतम विधीने संदल लेपन करून गलफ विधी संपन्न झाला.दरम्यान खतम विधी नंतर दर्गा पंच जहागीर जमादार,मुन्ना जमादार, शराफत बाणदार,समीर फकीर,यांच्या हस्ते गलफ अर्पण करून उरुसाला सुरवात झाली.कर्नाटक राज्यातील निपाणी येथील दर्गःहमध्ये उरुसाला सुरवात झाल्यानंतर ग्यारवी मासला प्रारंभ होतो.सोमवार पासून मास प्रारंभ झाल्याने कुरुंदवाड येथील म्हाबूसुभानी दर्गाह येथे सालाबाद प्रमाणे सोमवारी संध्याकाळी दर्गा पंच जमादार-अर्जुनवाडे कुटुंबीयांतर्फे संदल गंध लेपन विधी हजरत दौलतशहा वली यांच्या दर्ग्यातून वाजत-गाजत भक्तांच्या उपस्थितीत मिरवणुकीने आणून खतमविधी,सलाम विधी,गलफ, फुलाचा गलफ,खतम विधी संपन्न झाला.भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी मुस्लिम कमिटीचे इकबाल पटवेगार,मिरासाहेब पाथरवट,माजी नगराध्यक्ष फारूक जमादार,मेहबूब मोमीन,दस्तगीर फकीर,कैफ मोमीन,कुदरत भुसारी,अकिल गोलंदाज, सीताराम भोसले,सय्यद पट्टेकरी,गुलाब ढालाईत,आयुब पट्टेकरी, हाजी अल्ताफ बागवान कलंदर खलिफा,सुभाष गवळीसह आदी उपस्थित होते.