रोटरी सेवा करून माणुसकीचे दर्शन घडवते – मनोहर पवार

Spread the love

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचा वर्धापनदिन उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

जागतिक स्तरावरील सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबने आपल्या सेवेच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.यामुळे गरजूंना मदतीचा हात मिळाला.रोटरीच्या आदर्शवत कार्याचा सर्वांनाच अभिमान आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी केले.शिरोळ येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत समारंभाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रतिमा पूजन,विश्वशांती प्रार्थना आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.
यावेळी बोलताना मनोहर पवार पुढे म्हणाले की घरात संवाद असेल तर सुख निर्माण होईल.मुलांना शांत करण्यासाठी बाळाला जवळ घेण्याऐवजी मोबाईल दिले जाते.आपण जास्तीत जास्त वेळ मुलांना दिला तरच ती संस्कारी,ज्ञानी होतील असे प्रतिपादन मनोहर पवार यांनी केले. सहकुटुंब जेवण घेवून सामाजिक तत्व मुलांवर बिंबविणे अत्यावश्यक आहे. शेतकरी,शेतमजूर,कामगार यांचे योगदान महत्वाचे आहे.शेतकऱ्यांने कष्टाने धान्य पिकविले व ज्या माऊलीनी जेवण बनविले,भगवंताचे आभार मानण्यासाठी जेवणाच्या ताटाला नमस्कार करतो.रोटरी सेवा करते,माणुसकी देते,जे रंजले गांजले आहेत त्यांची सेवा करणे हे रोटरीचे काम आहे.
समारंभाचे प्रमुख पाहुणे रोटे.राजन राज्योपाध्ये म्हणाले की आपल्याकडील कल्चर वैशिष्टयपूर्ण आहे.गरजवंतांना सेवा द्यावी.रोटरीच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य घडत असते यामुळे आपण करत असलेल्या कामाचे चीज होते.
रोटरी हेरिटेज सिटी च्या वर्धापन दिनानिमित्त महिलासाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.त्यामधील

प्रथम क्रमांक – सुचित्रा संजय शिंदे,
द्वितीय क्रमांक – उर्मिला विष्णू पाटील,
तृतीय क्रमांक- चारूशिला संजीव पुजारी

 

यांनी यश मिळवले.विजेत्यांना रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.अरविंद माने यांचेकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली.रोटे.प्रदिप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.गायक संजय कोळी,संदिप कोळी,पृथ्वीचंद माछरेकर,प्रवीण कांबळे यांनी बहारदार अशी भक्तीगीते व भावगीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे खजिनदार तथा पत्रकार चंद्रकांत भाट,इव्हेंट चेअरमन संजय पाटील (माऊली) माजी अध्यक्ष डॉ. अरविंद माने,संजय तुकाराम शिंदे,सदस्य संजीव पुजारी,विराजसिंह यादव, डॉ.अजितकुमार बिरनाळे डॉ.उमेश कळेकर,डॉ.अतुल पाटील, अनिकेत जोशी, उल्हास पाटील, रणजीतसिंह जगदाळे,अमित जाधव, सुरेश देशमुख,श्रीकांत जाधव,शिवाजी कोळी,सचिन सावंत,विक्रमसिंह भोसले,भरत गावडे,पत्रकार बाळासाहेब कांबळे,संदिप इंगळे,दिलीप शिरढोणे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य,कुटुंबीय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचलन नितीन बागूल यांनी केले. स्वागत प्रेसिडेंट तुकाराम पाटील(भैया) यांनी तर प्रास्ताविक संजय पाटील (माऊली) यांनी केले.आभार सेक्रेटरी प्रा.के.एम.भोसले यांनी मानले.

error: Content is protected !!