जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुरेश माणगांवे तर उपसभापती पदी सौ.दिपाली चौगुले यांची बिनविरोध निवड
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुरेश शिवगोंडा माणगांवे, रा. दानोळी व उपसभापती पदी सौ. दिपाली सतीश चौगुले, रा.उदगांव यांची बिनविरोध निवड झाली.बाजार समितीचे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी विशेष सभा झाली.सहाय्यक निबंधक अनिल नादरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सभापती पदासाठी सुरेश माणगांवे यांचे नाव विजयसिंह माने देशमुख यांनी सुचविले त्यास चंद्रकांत जोंग यांनी अनुमोदन दिले,तर उपसभापती पदाकरीता सौ.दिपाली चौगुले यांचे नाव संजय अनुसे यांनी सुचविले त्यास किरण गुरव यांनी अनुमोदन दिले.यावेळी सभापती पदासाठी सुरेश माणगांवे व उपसभापती पदाकरीता सौ.दिपाली सतीश चौगुले यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी घोषित केले.या निवड सभेस संचालक सुभाषसिंग रजपूत,मुजमिल पठाण,विजयसिंह माने देशमुख,रामदास गावडे,शिवाजी चव्हाण, महावीर पाटील,सौ.माधुरी सावगांवे,चंद्रकांत जोंग,द-याप्पा सुतार,संजय अनुसे,किरण गुरव, सिद्राम कांबळे,दादासो ऐनापूरे,भगवान पाटील तसेच बाजार समितीचे सचिव सुनिल गावडे व कर्मचारी वर्ग यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.नुतन सभापती सुरेश माणगांवे व उपसभापती सौ.दिपाली चौगुले तसेच निवडणूक अधिकारी अनिल नादरे सहाय्यक निबंधक यांचा सत्कार विविध संस्था तसेच बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच मावळते सभापती सिद्राम कांबळे व उपसभापती द-याप्पा सुतार यांचाही तसेच संचालक संजय अनुसे यांची शिरोळ तालुका शिवसेना (उध्दव ठाकरे) अध्यक्षपदी निवड झालेबद्दल बाजार समितीचे वतीने सत्कार करणेत आला.बाजार समितीमधील सर्व संचालक व कर्मचारी यांना बरोबर घेवून शेतकरी,व्यापारी यांचा विकास साधला जाईल असे आश्वासन नूतन सभापती सुरेश माणगांवे यांनी दिले.बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख यांनी प्रास्तावीक केले व सुभाषसिंग रजपूत यांनी बाजार समितीचे सद्यापरिस्थितीचा आढावा घेतला व आभार मानले.