कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
नदाफ क्लिनिक हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले असून,वडिलांच्या बरोबर मुलाने चालू केलेली समाजसेवा खरोखरच उल्लेखनीय आहे.नदाफ क्लिनीकच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस मधुमेहाची तपासणी कुंभोज येते करण्यात येईल अशा आश्वासन मधूमेह तज्ञ डॉ.बोरगावे यांनी आज रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नदाफ क्लिनीकच्या उद्घाटन प्रसंगी दिले.यावेळी त्यांनी मधुमेहासाठी आवश्यक असणारी औषधोपचार व उपाय योजना यावर मनोगत व्यक्त केले.या क्लिनिकचे उद्घाटन निरामय हॉस्पिटल इचलकरंजीचे डॉ.एम.ए.बोरगावे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिक्षण सभापती प्रवीण यादव,जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी,तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे,बी.एल.शिंगे, अँड.अमर घोरपडे,डॉ. शिराज नदाफ,डॉ. मनोज कांबळे,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके,बावडा संचालक अमित साजनकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार नदाफ परिवाराच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ.तबरेज सिराज पिंजारी (नदाफ),प्रास्ताविक सुभाष देवमोरे तर आभार किरण नामे यांनी मानले.