शिरोळ बुवाफन महाराज उत्सव व उरुस २०२४ संयोजनाचा मान ओन्ली गजराज मंडळास

Spread the love

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह पुरुष समितीचे अध्यक्षपदी केतन चव्हाण

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्र कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असणारा शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस साजरा करण्याचा मान ओन्ली गजराज मंडळास मिळाला असून केतन कृष्णा चव्हाण (भाट) यांची उत्सव व उरुस संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे.उत्सव व उरूस साजरा करण्यासाठी शिरोळ नगरपालिकेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती.उत्सव आणि उरूस साजरा करण्यासाठी आपल्या मंडळास मान मिळावा यासाठी शहरातील 60 तरुण मंडळांनी एक हजार रुपये भरून नगरपालिकेकडे नोंदणी केली होती.चिट्ठी टाकून उत्सव व उरूस साजरा करण्यासाठी मंडळाची निवड करण्यात आली.यावेळी ह. भ.प.संपतराव महात्मे यांच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली.४४ क्रमांकाची चिट्ठी निघाली यामध्ये ओन्ली गजराज मंडळास उत्सव आणि उरूस संयोजन समितीचा मान मिळाला असून केतन कृष्णा चव्हाण भाट यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्याहस्ते अध्यक्ष केतन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान उत्सव आणि उरूस साजरा करण्याकरता मंडळांनी दिलेल्या नोंदणी शुल्कामधील २५ हजार रुपयाची देणगी श्री बुवाफन महाराज मंदिर जिर्णोद्धार समितीला देण्यात आली.तर उर्वरित रक्कम ही श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समितीकडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज श्री शंभूआप्पा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर हजरत नूरखान बादशाह दर्गाह येथे जाऊन समाधीचे दर्शन घेतले. यावर्षीचा उत्सव व उरूस पारंपारिक पद्धतीने धार्मिक व भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल.ओन्ली गजराज मंडळ,श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळ यादव चौक भाट गल्ली,श्री जयहिंद मंडळ काळे गल्ली या तिन्ही मंडळाच्या वतीने उत्सव व उरूसाचे नियोजन नेटके करण्यात येईल अशी प्रतिक्रिया युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी यावेळी बोलताना दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल यादव,अवधूत उर्फ बाबाजी पाटील-देसाई, पत्रकार चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे,दीपक भाट,अमित भाट,दत्तात्रय बाबर,लालासो गावडे,प्रफुल कोळी,शिवाजी कदम,विजय भाट,जयदीप काळे, सचिन भाट,विशाल काळे,सागर काळे,पारस भाट, साहिल भाट,संकेत कोळी,विनायक कोळी,गजानन कोळी,उमेश माने,रविराज जगदाळे,अर्जुन जाधव,पप्पू संकपाळ,विनायक बाबर, नवनाथ भाट,रणजीत भाट, यांच्यासह तिन्ही मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

—– महत्वाची चौकट —–

श्री बुवाफन महाराज मंदिर जिर्णोद्धार समितीला २५ हजार रुपयांची देणगी

उत्सव आणि उरूस साजरा करण्याकरता मंडळांनी दिलेल्या नोंदणी शुल्कामधील २५ हजार रुपयाची देणगी श्री बुवाफन महाराज मंदिर जिर्णोद्धार समितीला देण्यात आली.तर उर्वरित रक्कम ही श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समितीकडे सुपूर्द करण्यात आली.यावर्षी पासून दरवर्षी २५ हजार रुपयांची देणगी श्री बुवाफन महाराज मंदिर जिर्णोद्धार समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!