पु.शिरोलीत दसरा मैदानात संस्थान कालीन ऐतिहासिक सिमोल्लंघन सोहळा
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील दसरा मैदानामध्ये सिमोल्लंघन सोहळा व त्या भक्तीमय वातावरणात पार पडला शिरोलीतील गावाकामगार पोलीस पाटील घराण्यातील मानकरी राजेश पाटील आणि सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली श्री काशिलिंग बिरदेव देवाचे सर्व मानकरी ग्रामपंचायत सदस्य सदस्य प्रतिनिधी पदाधिकारी हे सर्व सायंकाळी चार वाजता गावातील म्हसोबा मंदिर येथे जमून श्री म्हसोबाची पालखी ढोल खैताळा निनादात भंडाऱ्याची उधळण करीत गावातील मान्यवर ग्रामस्थ सहभागी झालेली म्हसोबा पालखी ग्रामपंचायत मार्गे श्री काशिलिंग बिरदेव या मंदिरामध्ये घेऊन येतात त्यानंतर देवास पेरावा केला जातो तर नंतर श्री काशिलिंग बिरदेवाची पालखी श्री म्हसोबांच्या पालखीच्या भेटीसाठी आपल्या मंदिराच्या प्रांगणात येते व समाजातील बांधव त्या दोन्ही पालख्यांची ढोल कैताळाच्या निनादात व भंडाऱ्याची उधळण करीत दोन्ही देवांची भेट होते त्यानंतर . या दोन्ही पालख्या जयशिवराय तालीम मार्गे दसरा मैदानात ढोल कैताळाच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत दसरा मैदानात दाखल झाल्या. यावेळी गावकामगार पाटील घराण्याचे मानकरी राजेश पाटील यांचे हस्ते आपट्याच्या पानावर तलवार मारून सोने लूटण्यात आले. त्यानंतर दोन्ही पालख्या पुन्हा बिरदेव मंदिरात आल्या. याठिकाणी पारंपरिक विधीसह बिरदेवाची आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पंकज गिरी, सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील, राजाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीपपाटील, निवास कदम, अविनाश कोळी, डॉ.. सुभाष पाटील, उद्यसिंह पाटील, विजय जाधव, धनाजी पाटील, योगेश खवरे,राष्ट्र सेवा युवक संघटना अध्यक्ष संजय पाटील,बाळासाहेब पाटील,नितीन चव्हाण, अर्जुन चौगले, पांडुरंग तावडे, राजाराम चौगुले,दिपक यादव, बाबासो कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष- सतिश पाटील, जगन्नाथ पाटील, महादेव सुतार, ऋषिकेश सरनोबत, रत्नसिंह पाटील, यश पाटील, अनिल शिरोळे, बापू पुजारी, विश्वास गावडे, नागनाथ गावडे, संदीप पुजारी,बाळासो पुजारी, संदीप तानवडे, प्रल्हाद खोत, कुमार पाटील, विश्वास गावडे, लखन घाटगे, रावसो घाटगे, भुपाल कांबळे , ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी सर्व संस्थांचे पदाधिकारी आदिंसह ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. या सिमोल्लंघन साठी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता