शिरोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Spread the love

शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून पक्षाची ध्येयधोरणे व विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.लोकसभा निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेवून प्रचाराचा शुभारंभ करून मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहे. सासरे स्वर्गीय रामचंद्र देसाई व पती वसंतराव देसाई यांच्या बहुजन समाजाशी असलेली नाळ,विकासाभिमुख विचारांचा वारसा पाठीशी आहे.महिलांवरील सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या घटना,महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी,महिलांच्या प्रश्नांना समर्थपणे एक महिलाच समजून घेवून अधिक तत्परतेने व गांभीर्याने मांडू शकते यासाठी पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.तर शिरोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागणी केली असल्याची माहिती सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांनी आज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते एकमेव उमेदवारी मागणी केलेली आहे.

error: Content is protected !!