अखेर कोळी महादेव जमातीच्या ४ मयत वारसांना सेवानिवृत्तीवेतनाचे मिळाले पीपीओ
१५ दिवसांत उर्वरित पीपीओ देण्याचे दिले अभिवचन
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अनुसूचित कोळी महादेव जमातीच्या ३२ कर्मचारी दोन वर्षांपासून सेवानिवृत्तीपासून वंचित होते.शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अकरा महिन्यांच्या सेवेनंतरचा एक दिवसाच्या तांत्रिक खंड माफ करण्याचा निर्णय घेतला होता.३२ कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही उपयोग न झाल्याने आमरण उपोषण ही केले होते. ९ सप्टेंबर २०२४ रोजी खासदार धैर्यशील माने,आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार राजेश पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर,विजय भोजे,डॉ.मनोहर कोळी,महादेव कोळी,वाल्या सेना जिल्हाध्यक्ष विकास शिरगावे व इतर लोकप्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केली होती.लोकप्रतिनिधीनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सचिव विकास खारगे यांचेकडे प्रश्नांची गांभीर्यता लक्षात आणून देवून पीपीओ मिळण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नाने आज ३२पैकी अर्जुन शिवलिंग डंगी,भिमाप्पा इराप्पा डंगी,उदय दत्तू कोळी व अशोक बापू कोळी या ४ मयत वारसांना सेवानिवृत्तीवेतनाचे पीपीओ देण्यात आले.एका मयत वारसाचे काम चालू आहे.तर उर्वरित सेवानिवृत्तांची पीपीओ ऑर्डर १५ दिवसांत देण्याचे अभिवचन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिले.याकामी मुख्यमंत्री कार्यालय,जिल्हा परिषद कोल्हापूरचे अधिकारी,खासदार धैर्यशील माने यांचे स्वीय सहाय्यक जयंत पवार,बाबासाहेब वनकोरे,आमदार यड्रावकर यांचे स्वीय सहाय्यक राम छाचोड,रितेश हिलगे,अजय पाटील, प्रसारमाध्यमे,पत्रकार,जमात बांधव यांचे अनमोल सहकार्य लाभले.याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे,कोल्हापूर मनपाच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी,जिल्हाध्यक्ष विजय भोजे,डॉ.मनोहर कोळी,बाबासाहेब वनकोरे,भगवान कोळी यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी,जमात बांधव उपस्थित होते.
महत्वाची चौकट
लोकप्रिय खासदार धैर्यशील माने,कर्तबगार आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री कार्यालय सचिव विकास खारगे यांच्याशी सेवानिवृत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र केलेली धडपड सार्थ ठरल्याबद्दल सेवानिवृत्तांमध्ये कृतज्ञतेची भावना दिसून येत होती.