माजी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून चावरे ता.हातकणंगले येथील नूतन तलाठी कार्यालयास भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या विशेष प्रयत्नातुन सुमारे 22 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.त्याचा पायाखुदाई समारंभ राजाराम साखरचे चेअरमन व माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आज शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.या समारंभास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या प्रमुख उपस्थित होते.यावेळी सरपंच उदय पाटील,उपसरपंच मकरंद बोराडे,वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बी.जी.
बोराडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील,धनाजी घोडके,सुरेश हमगडे,रणजित पाटील, साहेबराव पाटील,मारुती धनवडे,आर.डी. घोडके,दिलीप घोडे,कुमार घोडे,आप्पासाहेब पाटील,शिवाजी करबाळे, शिवाजी पाटील, महिपती निकम,महेंद्र शिंदे सरकार, विलास पाटील,यांसह प्रमुख कार्यकर्ते-ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.