जयसिंगपूर घरफोडीतील ३ लाख ९२ हजार रुपयाचे दागिने जप्त

Spread the love

जयसिंगपूर शहरातील मगदूम मळा येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा जयसिंगपूर पोलिसांनी 36 तासात उघडकीस आणला. चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३ लाख ९२ हजार रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले.जयसिंगपूर पोलिस ठाण्यातुन याबाबत माहिती अशी की. ९ आॅक्टोंबर रोजी नबीरसुल अलीसाहेब वालीकर यांच्या घराचा दरवाजा तोडून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती.घटनेनंतर गुन्हेशोध पथकाने तपास केला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले.त्याच्या पॅन्टच्या खिशात रुमालामध्ये बांधून ठेवण्यात आलेले दागिने मिळून आले.जयसिंगपूर येथील चोरीची त्याने कबुली दिली.त्याच्याकडून ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ताहीर मुल्ला वैभव सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!