कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा

Spread the love

हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा
स्वाभीमानी पक्षाची तहसिलदारांकडे मागणी

कुंभोज प्रतिनीधी / विनोद शिंगे

 

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या केंद्रावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिला.या संदर्भात आज हातकणंगले तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.सोयाबीन काढणी सध्या जोरात चालू आहे. सोयाबीन काढल्या नंतर आर्थिक अडचणीमुळे व साठवणुकीसाठी जागा नसल्यामुळे सोयाबीन विक्रीचा सपाटा शेतकऱ्यांनी लावला आहे.याचा गैरफायदा सोयाबीन खरेदी केंद्र व व्यापारी घेत आहेत.सोयाबीनचा हमीभाव रु.४८९२ ठरवण्यात आला आहे.तरीसुद्धा खरेदी केंद्र व व्यापारी सोयाबीन ४००० रूपये दराने खरेदी करत आहेत यामध्ये शेतकऱ्याचे क्विंटल पाठीमागे नऊशे ते एक हाजार रुपये नुकसान होऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सध्या चालू आहे.तेव्हा तहसीलदारांनी अशा केंद्रावर धाडी टाकून त्यांचे वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व शासनातर्फे सोयाबीन खरेदी केंद्र गावोगावी सुरू करावीत.यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या वतीने जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलकांनी प्रशासकीय भवना च्या अवारात सोयाबिन काडासह जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी तालुका अध्यक्ष राजाराम देसाई ,आप्पासाहेब एडके,धनाजी पाटील,संपत पवार

,शिवाजी आंबेकर ,सुनील सूर्यवंशी ,अमित पाटील ,दिलीप कुमार जगोजे ,सुनील वडगावे, सुरेश पाटील, उमेश पाटील, अंकुश चव्हाण ,संभाजी पाटील, कृष्णात मोहिते ,मनोहर देसाई, गणपती वाघ, अंकुश पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

चौकट

सध्या हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमानात व्यापाऱ्यांकडून सोयाबिनची खरेदी चालु आहे मात्र ती खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे . तर दुसरीकडे वजनामध्येही मोठ्या प्रमानात काटामारी चालु आहे आशा खरेदी केंद्र व व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा स्वाभिमानी पक्षाला तिव्र आंदोलन करावे लागेल

 

वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष

error: Content is protected !!