जयसिंगपूर / प्रतिनिधी
हसूर (ता. शिरोळ) येथील महेश शिवाजी कांबळे (वय २०) याने घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली.शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आत्महत्येची घटना उघडकीस आली.याबाबत ची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबतची वर्दी सुशांत कांबळे यांनी शिरोळ पोलिसात दिली.पोलिस भरतीमध्ये अपयश आल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.