कुंभोज येथे राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून २० लाखाच्या रस्ता कामाचा शुभारंभ

Spread the love

कुंभोज येथे राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून वीस लाखाच्या रस्ता कामाचा शुभारंभ-माजी खासदार राजू शेट्टी

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

कुंभोज तालुका हातकणंगले येथे अनिल भोकरे घर ते धुळा उंदरे यांच्या घरापर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपये मंजुरीच्या रस्ता कामाचा शुभारंभ आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते हे ग्रामीण भागाच्या विकासाचे महत्त्वाची साधन असून त्यासाठी लागेल तितक्या प्रमाणात फंड आणून ते रस्ते पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुंभोज ग्रामपंचायतच्या सरपंच स्मिता चौगुले या होत्या यावेळी सदर रस्ता कामासाठी वीस लाख रुपये चा फंड दिल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी व युवा नेते सौरभ शेट्टी यांचा ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने उपसरपंच अशोक आरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे, विनायक पोद्दार, सदाशिव महापुर, दावीत घाटगे, पंचायत समितीच्या सदस्य जयश्री पांडव ,महेश पांडव, ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे, महविकास आघाडीचे गटनेते किरण माळी माजी सरपंच प्रकाश पाटील, जयसिंगपूर नागरी पतसंस्थेचे चेअरमन अनिल भोकरे, आप्पासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील ,शुभांगी माळी ,संभाजी मिसाळ, भारती पोद्दार,लखन भोसले, सुभाष देवमोरे,अजित देवमोरे ,माधुरी गोदे, अमरजीत बंडगर ,जयश्री जाधव, अनिकेत चौगुले ,विशाखा माळी, विनायक पोद्दार तसेच दुधेश्वर हिंगलजे, शिवाजी किबीले, रितेश हिगंलजे, अभिजीत कोळी, महेश माळी,कुबेर करके,आदिनाथ पाटील, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन कोळी, मिलिंद नकाते ,राजकुमार तोरस्कर, सुरेश दासरे,तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!