हंगाम 22 23 मधील 100/चा हप्ता द्या मागील हंगाम फायनल 3500 व चालूला पहिली उचल ४ हजार जाहीर करुनच कारखाने चालु करा
गुरुदत्त कारखान्याने उस गळीत हंगाम 22 -23 मध्ये गेलेल्या ऊसाला 100/रुपये तात्काळ द्यावा तसेच शेवटच्या महिन्यामध्ये किसान कार्ड साठी गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता सुद्धा द्यावा अन्यथा असल्या योजनांवर शेतकरी विश्वास ठेवणार नाही.
मागील वर्षभरात साखर व उपदार्थातुन चांगला नफा कारखान्यांना झाला आहे .त्यामध्ये 3100 रुपये पहिली उचल मिळाली आहे पण 3100/ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही यामध्ये शेतकऱ्यांची पीक कर्ज सुद्धा भागत नाहीत .याचा परिणाम शेतकरी गेली दहा वर्षापासून आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे त्यामुळे मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता देऊन 3500/रुपये फायनल करा. त्याचप्रमाणे दरवर्षी होणाऱ्या ऊस आंदोलनामध्ये शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आपल्या कारखान्यांने पुढाकार घेऊन चालू गळीत हंगामामध्ये पहिली उचल 4000/जाहीर करून कारखाना चालू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घ्यावाअन्यथा शेतकर्यांना संघर्षाशिवाय पर्याय नाही असे निवेदन देण्यात आले.यावेळी कारखान्यांचे ऊस विकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून सर्व मागण्या चेअरमन व एम डी यांच्या कडे मांडून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, राजू पाटील रोहन पाटील सुदीप पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते.